महाराष्ट्र
नाशिक शहरात शनिवारी, २४ ऑक्टोबरला दिवसभर पाणी नाही; सहाही विभागांत जलवाहिन्यांची दुरुस्ती, रविवारी सकाळी कमी दाबाने पुरवठा
जलवाहिन्यांवरील मोठ्या गळत्या, नवे व्हॉल्व आणि जोडण्यांच्या कामांसाठी नाशिक महापालिका शनिवारी संपूर्ण शहराचे पाणी बंद ठेवणार आहे. कामांना १२ ते १८ तास लागतील, असा अंदाज आहे. रविवारी सकाळचे पाणीही कमी दाबाने येईल.
