शेती
नांदेडच्या मुदखेड, मुखेड तालुक्यांत दुष्काळाच्या तीव्रतेची प्रत्यक्ष पडताळणी होणार
राज्यातील आणखी १८ तालुक्यांसाठी शासन निर्णय; प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण, उपग्रह माहितीची क्षेत्रावर खातरजमा
माय महा राष्ट्र वृत्तसेवा, नांदेड
प्रकाशित:

नांदेड : दुष्काळी परिस्थितीचे अधिक अचूक मूल्यमापन व्हावे, यासाठी राज्य सरकारने आणखी १८ तालुक्यांत दुष्काळाच्या तीव्रतेची प्रत्यक्ष पडताळणी (ग्राउंड ट्रुथिंग) करण्यास मान्यता दिली आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील मुदखेड आणि मुखेड या दोन तालुक्यांचा समावेश आहे. मदत व पुनर्वसन विभागाने शुक्रवारी (ता. ९) याबाबतचा शासन निर्णय जारी केला.
या तालुक्यांत प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण केले जाईल. उपग्रह छायाचित्रे, नकाशे आणि संगणकीय माहितीतून आलेल्या निष्कर्षांची प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन खातरजमा केली जाईल. दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधील तरतुदींनुसार ही पडताळणी होणार असून त्यातून पिकांची प्रत्यक्ष स्थिती स्पष्ट होईल आणि पुढील निर्णयांसाठी सरकारला वस्तुनिष्ठ माहिती मिळेल.
मंत्रिमंडळ उपसमितीच्या २९ सप्टेंबरच्या बैठकीतील निर्देशानुसार जून ते सप्टेंबरमधील पावसाची तूट आणि इतर घटक विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. २५ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांत ट्रिगर-१ लागू होऊन दुष्काळ जाहीर झाला असून तेथे १२ उपाययोजना आणि सवलती लागू आहेत.
नांदेडसह चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर; गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, देवरी, सालेकसा, गोंदिया; वर्धा जिल्ह्यातील कारंजा; भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर; नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड; सातारा जिल्ह्यातील पाटण आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा व वाळवा या तालुक्यांतही ही पाहणी होणार आहे.
माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा
संबंधित बातम्या
- १०० वनराई बंधारे, ६ दिवस आणि शून्य खर्चात! नाशिकच्या शेतकऱ्यांची दुष्काळाशी लढण्यासाठी अभूतपूर्व एकजूट
- वडेगाव-भजेपारच्या शेतकऱ्यांना आरसीबी कालव्यातून पाणी द्या; आमदार विजय रहांगडाले यांचे पाटबंधारे विभागाला निर्देश
- रामेश्वरच्या संत गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू; उसाला प्रतिटन ३,१५१ ते ३,३५१ रुपये भाव
- नांदेडमध्ये अवैध रेती उपशाविरोधात दिवसभर मोहीम; बोटी, तराफे आणि रेती असा २.१९ कोटींचा मुद्देमाल जप्त
- सुलवाडे-जामफळ योजनेच्या मुख्य पाइपलाइन जोडणीला सुरुवात; शिंदखेडा तालुक्यातील ५४ गावांना मिळणार तापीचे पाणी
- नांदेडमध्ये रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल प्रमाणित बियाण्यांचे नियोजन; हरभऱ्यावर भर
https://mymaharashtra.in/sheti/nandedachya-mudkhed-mukhed-talukyant-dushkalachya-tivratechi-pratyaksh-padtalni-10075
