मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

शेती

कुरुंदवाडीत २४ पशुपालकांना सोयाबीनच्या कुटारावर युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक; दुष्काळात चारा सकस करण्याचे मार्गदर्शन

चारा साक्षरता अभियानांतर्गत कुरुंदा पशुवैद्यकीय दवाखान्याचा उपक्रम; जिल्ह्यातील प्रत्येक गावात अभियान

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, हिंगोली

प्रकाशित:

जनावरांसाठी तयार केलेला चारा
प्रतीकात्मक छायाचित्र: Deepu.dhaipai / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 4.0

वसमत : दुष्काळात जनावरांसाठी चाऱ्याचे योग्य नियोजन करता यावे आणि उपलब्ध निकृष्ट चारा सकस करून जनावरांना देता यावा, यासाठी तालुक्यातील कुरुंदवाडी येथे चारा साक्षरता अभियानांतर्गत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. कुरुंदा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याने घेतलेल्या या प्रशिक्षणात गावातील २४ पशुपालक सहभागी झाले.

सोयाबीनच्या कुटारावर युरियाची प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता कशी वाढवायची आणि तो जनावरांना सकस चारा म्हणून कसा द्यायचा, याचे प्रात्यक्षिक या वेळी दाखवण्यात आले. दुष्काळाच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर करून जनावरांचे पोषण कसे टिकवायचे, याबाबतही पशुपालकांना माहिती देण्यात आली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपआयुक्त यांच्या सूचनेनुसार चारा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात हे अभियान राबवले जात आहे.

माहिती स्रोत: हिंदुस्थान समाचार

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा