मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

शेती

हिंगोली जिल्ह्यात ७९.६९ टक्के बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण; २.९० लाख शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद

पावसाच्या २४६.७ मिमी तुटीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, हळद, केळीसह पिकांना फटका; पाचही तालुक्यांत दुष्काळ जाहीर

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, हिंगोली

प्रकाशित:

हिंगोली जिल्ह्यातील हळदीचे शेत
प्रतीकात्मक छायाचित्र: Albert Deccan / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 3.0

हिंगोली : जिल्ह्यात दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू असून बुधवारपर्यंत (ता. ७) एकूण ३ लाख ९० हजार ६१९ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ३ लाख ११ हजार ३०९ हेक्टरचे, म्हणजे ७९.६९ टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले होते. जिल्ह्यातील ७१५ पैकी ५७० गावांत पंचनामे झाले असून एकूण ३,६३,९९० शेतकरी खातेदारांपैकी २,९०,६०२ जणांच्या नुकसानीची नोंद झाली आहे, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जून ते सप्टेंबर या पावसाळ्यात जिल्ह्यात २४६.७ मिमी पावसाची तूट नोंदवली गेली. पिकांच्या नाजूक अवस्थेत पावसाने दीर्घ ओढ दिल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद, केळी आणि ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसाच्या तुटीनुसार ट्रिगर-१ लागू झाल्याने जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असून मदतीसाठी हे पंचनामे केले जात आहेत.

महसूल, कृषी विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या यंत्रणा संयुक्तपणे पंचनामे करत आहेत. तालुकानिहाय पेरणी क्षेत्र असे: सेनगाव ९१,१७७ हेक्टर (१३४ गावे), हिंगोली ८१,८०५ हेक्टर (१५३ गावे), वसमत ८०,०५९ हेक्टर (१५१ गावे), कळमनुरी ७४,५९७ हेक्टर (१५५ गावे) आणि औंढा नागनाथ ६२,९८० हेक्टर (१२२ गावे).

माहिती स्रोत: ॲग्रोवन

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा