मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र

धारूर तालुक्यातील घागरवाडा परिसरात बिबट्याचा वावर; बाभळीच्या झाडावरील बिबट्या मोबाइलमध्ये कैद

५ ऑक्टोबरला चारदरी परिसरात वासरावर हल्ला; शेतात समूहाने जाण्याचे वन विभागाचे आवाहन

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, बीड

प्रकाशित:

झाडावर बसलेला बिबट्या
प्रतीकात्मक छायाचित्र: बिबट्या छायाचित्र: Davidvraju / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 4.0

धारूर : तालुक्यातील घागरवाडा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी (ता. ९) दुपारी एकच्या सुमारास बाभळीच्या झाडावर बसलेल्या बिबट्याचे एका ग्रामस्थाने अगदी जवळून मोबाइलवर चित्रीकरण केले. याआधी ५ ऑक्टोबरला चारदरी परिसरात बिबट्याने एका वासरावर हल्ला करून त्याला ठार केले होते.

तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आणि पशुपालक आधीच अडचणीत आहेत. त्यातच बिबट्याच्या वावरामुळे शेतात कामाला जाणाऱ्या आणि जनावरे चारायला नेणाऱ्या ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. वन विभागाने तातडीने पाहणी करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

घागरवाडा परिसरातील बिबट्याच्या वावराची खातरजमा केली जाईल आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे वन विभागाचे अधिकारी ईश्वर गुनावत यांनी सांगितले. ग्रामस्थांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांनी एकटे बाहेर पडू नये, शेतात शक्यतो समूहाने जावे आणि बिबट्या दिसल्यास त्याच्याजवळ जाण्याचा किंवा पाठलाग करण्याचा प्रयत्न न करता वन विभागाला कळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

माहिती स्रोत: पुढारी

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा