शेती
वाळव्यात चरायला गेलेल्या ४५ मेंढ्यांचा विषबाधेने मृत्यू; ११२ मेंढ्या वाचवण्यात यश
शेतातील संकरित ज्वारीचे फुटवे खाल्ल्याने विषबाधा; पशुसंवर्धन पथकाचे मध्यरात्रीपर्यंत उपचार
माय महा राष्ट्र वृत्तसेवा, सांगली
प्रकाशित:

वाळवा : नवेखेड-वाळवा रस्त्यानजीक वाळवा हद्दीत चरण्यासाठी नेलेल्या मेंढ्यांना विषबाधा होऊन ४५ मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सायंकाळी घडली. माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मध्यरात्रीपर्यंत उपचार करून ११२ मेंढ्यांचे प्राण वाचवले. या घटनेत चार मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या मेंढ्या बोरगाव शिवारातील एका शेतात बसवलेल्या होत्या. शुक्रवारी त्यांना चरण्यासाठी वाळवा हद्दीत नेण्यात आले. तेथे एका शेतातील संकरित ज्वारीचे फुटवे (किराळ) मेंढ्यांनी खाल्ले. सायंकाळी वाळवा-नवेखेड रस्त्याने बोरगावकडे परतताना मेंढ्या अचानक रस्त्यातच तडफडून कोसळू लागल्या.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. थोरे, सहायक आयुक्त डॉ. राजीव चंदनशिवे आणि सहायक आयुक्त खळीकर यांच्यासह पशुवैद्यकांच्या पथकाने मोबाइलचा फ्लॅश आणि टॉर्चच्या उजेडात उपचार सुरू ठेवले. उपचार सुरू होण्यापूर्वी २७ आणि नंतर १८ अशा ४५ मेंढ्या दगावल्या, तर ११२ मेंढ्या उपचारानंतर बचावल्या.
तहसीलदार सारिका रासकर, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा परिषद सदस्य संताजी मेटकरी आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि नुकसान झालेल्या मेंढपाळांना धीर दिला.
माहिती स्रोत: पुढारी
माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा
संबंधित बातम्या
- १०० वनराई बंधारे, ६ दिवस आणि शून्य खर्चात! नाशिकच्या शेतकऱ्यांची दुष्काळाशी लढण्यासाठी अभूतपूर्व एकजूट
- वडेगाव-भजेपारच्या शेतकऱ्यांना आरसीबी कालव्यातून पाणी द्या; आमदार विजय रहांगडाले यांचे पाटबंधारे विभागाला निर्देश
- रामेश्वरच्या संत गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू; उसाला प्रतिटन ३,१५१ ते ३,३५१ रुपये भाव
- तुळजापूरहून नवरात्रीची ज्योत आणताना अपघात; आटपाडी तालुक्यातील कौठुळीच्या दोघांचा मृत्यू
- सुलवाडे-जामफळ योजनेच्या मुख्य पाइपलाइन जोडणीला सुरुवात; शिंदखेडा तालुक्यातील ५४ गावांना मिळणार तापीचे पाणी
- नांदेडमध्ये रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल प्रमाणित बियाण्यांचे नियोजन; हरभऱ्यावर भर
https://mymaharashtra.in/sheti/valavyat-charayla-gelelya-45-mendhyancha-vishbadhene-mrutyu-112-mendhya-10229
