मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

मनोरंजन

मालवणमध्ये शनिवार-रविवारी ‘बीच लोककला महोत्सव’; बंदर जेटीवर विनामूल्य प्रवेश

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आयोजन; स्थानिक लोककलावंतांना व्यासपीठ

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, सिंधुदुर्ग

प्रकाशित:

होड्या उभ्या असलेला मालवणचा समुद्रकिनारा
प्रतीकात्मक छायाचित्र: मालवणचा समुद्रकिनारा छायाचित्र: Ankur Panchbudhe from Pune, India / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 2.0

मालवण : कोकणातील लोककला आणि सांस्कृतिक परंपरा रसिकांपुढे आणणारा ‘बीच लोककला महोत्सव’ शनिवार १० आणि रविवार ११ ऑक्टोबर रोजी मालवणमध्ये होणार आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या दोनदिवसीय महोत्सवाचे आयोजन केले असून त्यात स्थानिक लोककलावंत विविध कलाप्रकार सादर करतील.

मालवण बंदर जेटी वाहनतळावर दोन्ही दिवस सायंकाळी साडेपाचपासून कार्यक्रम सुरू होतील आणि प्रवेश विनामूल्य आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.

पारंपरिक लोककला आणि लोकपरंपरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी संचालनालयाकडून राज्यभर कार्यक्रम घेतले जात असून, मालवणचा महोत्सव त्याचाच भाग आहे. यामुळे स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळेल आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवणमध्ये येणाऱ्या पर्यटकांनाही कोकणच्या सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेता येईल.

संचालक प्रशांत खेडेकर यांनी मालवण परिसरातील नागरिक आणि पर्यटकांना महोत्सवाला मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आणि स्थानिक कलावंतांचा उत्साह वाढवण्याचे आवाहन केले आहे.

माहिती स्रोत: तरुण भारत

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा