मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र

परभणीत रविवारपासून श्री दुर्गामाता दौड; नवरात्रातील नऊ दिवस शहराच्या विविध भागांत पहाटे दौड

विजयादशमीला श्री अष्टभुजा देवी मंदिर येथे महादौडीने उपक्रमाची सांगता

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, परभणी

प्रकाशित:

भगवा ध्वज
प्रतीकात्मक छायाचित्र: आर्या जोशी / विकिमीडिया कॉमन्स, CC BY-SA 4.0

परभणी : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शहरात श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारपासून (ता. ११) सुरू होणाऱ्या या उपक्रमात नवरात्रातील नऊ दिवस रोज सकाळी सहा वाजता शहराच्या वेगवेगळ्या भागांतून दौड काढली जाईल. पहिली दौड रविवारी गांधी पार्क येथून निघेल.

त्यानंतर सोमवारी (ता. १२) जिंतूर रोडवरील श्री गणपती चौक, मंगळवारी (ता. १३) सिंचननगरातील श्री स्वामी समर्थ केंद्र, बुधवारी (ता. १४) जुना पेडगाव रोडवरील श्री सद्‍गुरूनगर मैदान आणि गुरुवारी (ता. १५) कारेगाव रोडवरील देशमुख हॉटेल येथून दौड निघेल. शुक्रवारी (ता. १६) जिंतूर रोडवरील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कमान, शनिवारी (ता. १७) वसमत रोडवरील श्री चिंतामणी महाराज मंदिर, रविवारी (ता. १८) ममतानगरातील श्री व्यंकटेश (बालाजी) मंदिर आणि सोमवारी (ता. १९) सुभाष रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक हे दौडीचे ठिकाण असेल.

विजयादशमीला, म्हणजे मंगळवारी (ता. २०) सकाळी सात वाजता प्रभावतीनगरीतील श्री अष्टभुजा देवी मंदिर येथे महादौड होईल आणि त्याने उपक्रमाची सांगता होईल. भगवा ध्वज घेऊन आणि जयघोष करत निघणाऱ्या या दौडीत तरुण-तरुणी, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

माहिती स्रोत: सकाळ

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा