मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ३५० मॉडिफाइड सायलेन्सरवर अकोल्यात चालवला बुलडोझर

तीन महिन्यांच्या मोहिमेत जप्त केलेले सायलेन्सर नष्ट; विक्रेत्यांवरही कारवाईचा पोलीस अधीक्षकांचा इशारा

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, अकोला

प्रकाशित:

हॉर्न वाजवू नये असे दर्शवणारी वाहतूक खूण
प्रतीकात्मक छायाचित्र: Sugeesh at Malayalam Wikipedia / विकिमीडिया कॉमन्स, Public domain

अकोला : शहरातील रस्त्यांवरून फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेटस्वारांविरोधात शहर वाहतूक पोलिसांनी तीन महिने राबवलेल्या मोहिमेत गाड्यांवरील बदललेले सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले होते. असे तब्बल ३५० मॉडिफाइड सायलेन्सर शुक्रवारी (ता. ९) बुलडोझर चालवून नष्ट करण्यात आले.

अशा सायलेन्सरच्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांनाही मोठा त्रास होत असून गेल्या काही दिवसांत अशा वाहनधारकांची संख्या वाढली होती. त्यामुळे वाहतूक शाखेचे निरीक्षक विलास पाटील यांनी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरभर ही मोहीम राबवली.

सायलेन्सर नष्ट केले असले तरी पुढे हा प्रकार होऊ नये, यासाठी मॉडिफाइड सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेट विकणाऱ्या व्यावसायिकांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक चांडक यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

माहिती स्रोत: तरुण भारत

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा