मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

गुन्हे

बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य; बांगलादेशी महिलेला फलटण न्यायालयाकडून दोन वर्षांचा कारावास

भिलकटी परिसरात मे २०२५ मध्ये प्रकार उघड; फलटण ग्रामीण पोलिसांच्या तपासानंतर शिक्षा

माय महा राष्ट्र वृत्तसेवा, सातारा

प्रकाशित:

न्यायाधीशांचा हातोडा
प्रतीकात्मक छायाचित्र: न्यायालय छायाचित्र: Chris Potter / विकिमीडिया कॉमन्स, CC BY 2.0

फलटण : बनावट आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे भारतात बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी एका ३३ वर्षीय बांगलादेशी महिलेला दोन वर्षे साध्या कारावासाची शिक्षा फलटणच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ठोठावली आहे.

फलटण तालुक्यातील भिलकटी गावच्या हद्दीत १८ फाटा परिसरात ८ मे २०२५ रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्याच्या सुनावणीत आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे पुढे आल्याने न्यायालयाने तिला दोषी ठरवले. सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. बांदल यांनी काम पाहिले, तर महिला पोलीस हवालदार वैशाली नेवसे आणि पोलीस कर्मचारी अमोल देशमुख यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.

माहिती स्रोत: पुढारी

WhatsAppFacebookXTelegram

माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा