गुन्हे
शिकारीच्या तयारीतील पाच जण राजापूर, लांज्यात ताब्यात; बंदुका, काडतुसे जप्त
दोन स्वतंत्र कारवायांत पिकअपसह मुद्देमाल हस्तगत; भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हे दाखल
माय महा राष्ट्र वृत्तसेवा, रत्नागिरी
प्रकाशित:

राजापूर : वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी विनापरवाना बंदुका, काडतुसे आणि टॉर्च घेऊन फिरणाऱ्या पाच जणांना राजापूर आणि लांजा पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवायांत ताब्यात घेतले. दोन्ही प्रकरणांत संशयितांविरोधात भारतीय हत्यार कायद्यानुसार (आर्म्स ॲक्ट) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
‘ऑल आऊट ऑपरेशन’अंतर्गत शुक्रवारी मध्यरात्री गस्त घालणाऱ्या राजापूर पोलिसांना कळसवली परिसरात तिघे संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. सहायक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील आणि सहकाऱ्यांनी त्यांची झडती घेतली असता विनापरवाना गावठी ठासणीची बंदूक आणि टॉर्च आढळले. पिकअप वाहनासह २ लाख १० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत गस्तीवरील लांजा पोलिसांना आंजणारी-शिरंबवली रस्त्यावरील ओवलाचा दांडा परिसरात झाडीत दोघे दबा धरून बसलेले आढळले. त्यांच्याकडून १२ बोअरची एक बंदूक, चार जिवंत काडतुसे आणि टॉर्च असा १० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वन्यप्राण्यांच्या अवैध शिकारीसाठीच ही शस्त्रे बाळगली होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शस्त्रे कुठून आणली आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
माहिती स्रोत: रत्नागिरी खबरदार
माय महा राष्ट्रशी जोडलेले राहा
संबंधित बातम्या
- टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: दोन महिलांसह चौघे ताब्यात; मुंबई पोलिसांना तीन दिवसांची ट्रान्झिट कोठडी
- दसऱ्याला हवामान कसे? मुंबईत निरभ्र आकाश आणि ३६ अंश; कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाच्या सरींची शक्यता
- शेअर बाजारात नफ्याचे आमिष; साताऱ्यात ज्येष्ठ नागरिकाची १.७१ कोटींची फसवणूक
- नांदेडमध्ये अवैध रेती उपशाविरोधात दिवसभर मोहीम; बोटी, तराफे आणि रेती असा २.१९ कोटींचा मुद्देमाल जप्त
- डोंगरकडा येथील श्री जटाशंकर मंदिरात दानपेट्या फोडल्या; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही दुसऱ्यांदा लंपास
- वेंगुर्ल्यात वृद्धेच्या घरातून चोरीला गेलेले २० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत
https://mymaharashtra.in/gunhe/shikarichya-tayaritil-pach-jan-rajapur-lanjyat-tabyat-banduka-kadtuse-japt-10308
